इकोफ्रेडली श्रीगणेशा चंद्रयान-३च्या देखाव्यात विराजमान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे निसर्ग संवर्धन करत सण साजरा करण्याचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने “माझा बाप्पा” स्पर्धा घेण्यात आली. ज्यात शाडू मातीपासुन गणेश मुर्ती बनविण्यात आल्या. स्पर्धक विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक शाडू मातीपासून सुबक व आकर्षक मुर्ती बनविल्या होत्या ज्यापैकी  मोरया ग्रुपची मूर्ति विजेती ठरली.

या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटिल यांच्याहस्ते व प्राचार्य नीरज चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण वरीष्ठ पर्यवेक्षिका जयश्री भोसले व कला शिक्षक गणेश सातपुते यांनी केले. या स्पर्धेचे नियोजन उत्सव समितीचे प्रमुख निलेश वानखेडे व केदार देशमुख, नितेश परब यांनी पाहिले. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आकर्षक गणेश मूर्ती बनविल्या.

एकूण ९ गटातून तीन क्रमांक काढण्यात आले. यात मोरया गृप प्रथम क्रमांकावर तर, दुसऱ्या क्रमांकावर गणेश गृप आणि तिसऱ्या क्रमांकावर विघ्नहर्ता गृपने बाजी मारली. या गणेशोस्तवात मोरया गृपची श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. यासोबतच भारतासाठी गौरव ठरलेल्या चांद्रयान ३ची प्रतीकृतीचा देखावा सादर करण्यात आला होता.

पाचव्या दिवशी पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची गरज का असून कोणकोणत्या प्रकारे आपण निसर्गानुरूप सण कसे साजरे करु शकतो? याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आणि डिजेच्या तालावर इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ठेका धरत विसर्जन मिरवणूकित सक्रिय सहभाग घेत इकोफ्रेंडली “माझा बाप्पा”चे “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत जड अंतःकरणाने शाळेतच बनविलेल्या जलकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी मिरवणुकीत  संस्थेचे संचालक पराग पाटिल, संचालिका देवेश्री पाटिल यांचेसह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

Protected Content