किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलचा यंदाही शंभर टक्के निकाल!

यावल- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगावपासून जवळ असलेल्या इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच शाळेने मागील १२ व्या वर्षांपासूनची परंपरा कायम आहे.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या अवांतिका गिरी ९२.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर भरत पारिस्करने ९१% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर यश पाटील ९०.४०% व अनुष्का पाटील ९०.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक व आदित्य नेवे ८७.४०% गुण, स्नेहल पाटील ह्या विद्यार्थीनींला ८७% गुण मिळविले. मग उर्वरीत सर्व विद्यार्थी ७५% च्यावर गुण मिळवून उतीर्ण झाले असून इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलची ११ वर्षापासून सुरू असलेली १००% निकालाची परंपरा १२ व्या वर्षीही कायम ठेवली आहे. इयत्ता १० वीत उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, व्हा.चेअरमन शैलेजाताई विजयकुमार पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील, व्यवस्थापक पुनम मनिष पाटील, प्रा. अशोक प्रतापसिंग पाटील, उप प्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव, स्कुलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Protected Content