पारोळ्यात संजय राऊत यांच्या प्रतिमेला ‘जोडे मार’ आंदोलन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार संजय राऊत यांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत उल्लेखावर केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून येथे त्यांच्या प्रतिमेला ‘जोडे मार’ आंदोलन करण्यात आले.

 

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख आल्यानंतर थुंकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या या कृत्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. या अनुषंगाने पारोळा येथे शिवसेनेतर्फे आज ‘जोडे मार’ आंदोलन करण्यात आले.

 

पारोळा शहरातील महालक्ष्मी आटो पंप परिसरात आज शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यात आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वात संजय राऊतांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला.

 

या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, पं.स.माजी सभापती अरूण पाटील, जिजाबराव पाटील, बाजार समिती माजी उपसभापती दिलीप पाटील, भैय्यासाहेब पाटील, बापु मिस्तरी, मा.नगरसेवक राजु कासार, पी.आर.वाणी, संजय गोसावी, उंदीरखेडे सरपंच गणेश पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, राजेंद्र पवार, विलास वाघ, सुशिल पाटील, एकनाथ पाटील, बापु मराठे, साहेबराव पाटील, महेश मोरे, अमजद पठाण, आशिष पाटील, राज पाटील, मेहु येथील भैय्यासाहेब पाटील, म्हसवे येथील प्रविण पाटील, समाधान पाटील, गणेश पाटील, निलेश बोरसे, वेदांत पाटील, तेजु नरवाळे, सागर नरवाळे, निखिल चौधरी, शुभम बोरसे, राकेश करोसिया, पंजाबराव पवार, शरद पवार यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content