पो कॉ अश्विनी निकम यांना ” नारीशक्ती रत्न ” पुरस्कार

जळगाव : प्रतिनिधी । मुंबई येथे मनुष्यबळ विकास लोक सेवा अकादमी राज्यस्तरीय गुणगौरव महासंमेलन या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यामध्ये जिल्ह्यातून अश्विनी निकम { महिला पोलीस व कराटे प्रशिक्षक ) यांची निवड करण्यात आली होती 30 सप्टेंबररोजी त्यांना नारी शक्ती रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले

हा पुरस्कार ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता परंतु covid-19 च्या प्रभावामुळे वितरण सोहळा रद्द करण्यात आला व पुरस्कार पोस्टाद्वारे त्यांना पाठवण्यात आला . दोन दिवसांपूर्वीच अश्विनी निकम यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ .प्रविण मुंढे यांच्या हस्ते व पोलीस उपअधीक्षक ( गृह ) दिलीप पाटील , पोलीस निरिक्षक राजेशसिह चांदेल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला.

पोलीस प्रशासनामध्ये महाराष्ट्रातून एकमेव पो कॉ .अश्विनी निकम यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे प्रशासनामध्ये कौतुक केले गेले पोलीस अधीक्षक डॉ . प्रविण मुंढे यांनी अश्विनी निकम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . पो कॉ . अश्विनी प्रताप निकम जिल्हा विशेष शाखा अंतर्गत पोलीस पाल्य व बाहेरील विद्यार्थ्यांना कराटे व स्केटिंग प्रशिक्षण देत आहेत.

Protected Content