विद्यापीठ प्रशाळास्तरीय आविष्कार स्पर्धेत २४४ विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांची आविष्कार संशोधन स्पर्धा  गुरुवार दि. २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठात झाली.  १६९ प्रवेशिकेव्दारे २४४ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

 

सकाळी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते  विद्यापीठाच्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांची आविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्र- कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे , स्पर्धेचे समन्वयक प्रा. एस. आर. कोल्हे, उपसमन्वयक प्रा.जे.व्ही.साळी, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.सुनील कुलकर्णी आणि कॅम्पस स्पर्धेचे समन्वयक डॉ.व्ही.व्ही.गिते व उपसमन्वयक डॉ.व्ही.एम. रोकडे आदी उपस्थित होते

Protected Content