मुंबई वृत्तसंस्था । आज भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या डे-नाईट कसोटीची सुरुवात होणार असून या सामन्यासाठी 100 हून अधिक गुलाबी बॉल एसजी कंपनी कडून बनविण्यात आले आहेत. तसेच या डे-नाईट टेस्टला ‘पिंक’ टेस्ट ही संबोधले जाते. कारण डे-नाईट टेस्टमध्ये पिंक बॉल वापरला जातो. टेस्टमध्ये जर रेड बॉल वापरला जातो तर मग डे-नाईट टेस्टमध्ये पिंक बॉल का वापरला जातो ? आणि हा बॉल नक्की बनवला तरी कसा जातो जाणून घ्या.
उत्तर प्रदेशातील मीरत इथल्या एस.जी. फॅक्टरीत हे पिंक बॉल बनवले जात आहेत. कोलकात्यात होणाऱ्या पहिल्याच डे-नाईट टेस्टमध्ये हे बॉल वापरले जाणार आहेत. लेदरलापासून पिंक बॉल बनवला जातो. लेदरला पिंक कलर लावला जातो. त्यानंतर लेदरला मशीननं आणि मग हातानं प्रेस केलं जातं. त्यानंतर लेदरचे तुकडे केले जातात आणि दोन तुकडे शिवले जातात. यातून बॉलचा एक हाफ कप बनला जातो. अशाप्रकारे लेदरच्या चार तुकड्यांतून बॉलचे दोन कप बनवले जातात. या दोन कपमध्ये वूलनचा मशीनने बनवलेला गोल आकाराचा कोअर ठेवला जातो आणि दोन्ही कपला एकमेकांना शिवून बॉल बनला जातो. मात्र तत्पूर्वी लेदरच्या या कप्सना पुन्हा कलर केले जाते. कारण हा चेंडूचा रंग हा ८० ओव्हर्सपर्यंत टिकला पाहिजे. त्यानंतर कोटींग आणि शिवण केलं जातं. बॉलची मधली शिवण ही खूप काळजीपूर्वक केली जाते. कारण याच शिवणमुळे बॉलर्सना बॉलची व्यवस्थित पकड मिळते. यानंतर बॉलचे तीनवेळा वजन केले जातो. टेस्टसाठी बॉलचे वजन हे १५६ ते १६३ ग्रॅम एवढे असावे लागते. अशाप्रकारे कलर आणि क्युअर, शिवण अशा बऱ्याच प्रक्रियेनंतर सहा ते सात दिवसात हा बॉल तयार होत असतो.
… म्हणून पिंक बॉल बेस्ट
टेस्टमध्ये रेड बॉल वापरला जातो. मग या डे-नाईट टेस्टसाठी पिंक बॉल का असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडला असेल. याला कारण म्हणजे पिंक बॉल लाईट्समध्ये रेड बॉलपेक्षा अधिक उठून दिसतो हे प्रमुख कारण आहे. रेड बॉल्सप्रमाणेच पिंक बॉलची शिवण असल्याने बॉलर्स चाळीस-पन्नास ओव्हर्सनंतरही विकेट्स घेऊ शकतात. यापूर्वी पिवळा, नारंगी असा बॉल्सचा वापरही करुन पाहिला गेला. मात्र पिंक बॉल फ्लड लाईट्समध्ये जेवढा उठून दिसतो तेवढा कोणत्याही रंगाचा बॉल उठून दिसत नसल्याने पिंक बॉलवरच शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
या वर्षापासून पिंक बॉलचा वापर
२००९ मध्ये सर्वात प्रथम पिंक बॉलचा वापर करण्यात आला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला वन-डे मध्ये पिंक बॉलचा प्रथम वापर केला गेला. यानतंर २०१५ मध्ये झालेल्या पहिल्या डे-नाईट टेस्टमध्ये पिंक बॉलचा वापर करण्यात आला.