नाशिक महापालिकेवर भाजपचे वर्चस्व कायम

नाशिक प्रतिनिधी । येथील महापौरपदी सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी ज्येष्ठ नगरसेविका भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे येथे भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक येथील महापौरपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमिवर आज महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपने कब्जा मिळवल्याने विरोधकांची खेळी फसल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये फुट पाडण्याची खेळी करण्याचे संकेत दिले होते. मात्र हा प्रयोग फसल्याने आज भाजपचा महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यातून माजी मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक येथील पकड मजबूत असल्याचेही अधोरेखीत झाले.

Protected Content