किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड

Kishori Pednekar2

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या महापौरपदी आज बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांचे नाव निश्चित आहे.

 

मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता निवडणूक झाली.

Protected Content