भारताने चीनला दिलं सडेतोड उत्तर – ऑलिम्पिक उद्घाटन व समारोपाच्या समारोहावर घातला बहिष्कार

दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । चीनच्या अरेरावीपणाला भारताने सडेतोड उत्तर दिलं असून बीजिंग ऑलिम्पिक आणि समारोपाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या रिलेदरम्यान गलवान घटनेत जखमी चीनी कमांडरलाच चीननं मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवल्यामुळे भारताकडून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ” गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये भारतीय सैन्यासोबत झालेल्या चकमकीत चीनचे रेजिमेंट कमांडर’ क्यूई फैबाओ हे जखमी झाले होते. भारताने दिलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चीनने ऑलिम्पिक रिलेमध्ये मशालवाहक म्हणून क्यूई फैबाओ त्यांच्याच हाती मशाल सोपवली आहे. यामुळे भारत आणि चीनमधील संबंध अधिक ताणले गेले असून भारताचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात भारतानं घेतलेल्या मोठा निर्णयाची माहिती दिली आहे.

भारताने चीनच्या या निर्णयाचा भारतानं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचं राजकियीकरण करण्याचा चीनचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगत त्याचा निषेध म्हणून भारतीय राजनैतिक शिष्टमंडळ ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटन किंवा समारोपाच्या समारोहाला उपस्थित राहणार नाही”, अशी माहिती परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते बागची यांनी दिली. एकीकडे परराष्ट्र विभागाने भारतीय शिष्टमंडळ ऑलिम्पिकसाठी पाठवण्यास नकार दिला असताना प्रसार भारतीचे कार्यकारी अध्यक्ष शशी शेखर संपेती यांनी’ “दूरदर्शननं देखील ऑलिम्पिकचा उद्घाटन आणि समारोपाचा सोहळा लाईव्ह प्रक्षेपित करणार नसल्याचं जाहीर केल्याचं सांगितलं.

Protected Content