Home आरोग्य अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार

अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार

0
73


 

 

पुणे : वृत्तसंस्था । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिंगापूरचं वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. कोरोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल पुनावाला यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर ‘कोविशिल्ड’ नावाने लस विकसित केली आहे. भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.


Protected Content

Play sound