यश साळुंखे यांनी साकारले खासदार उन्मेश पाटील यांचे पेन्सिल स्केच

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील धुळे रोड परिसरात राहणारे आणि वास्तू विशारद कलेचा विद्यार्थी असलेले यश अनिल साळुंखे यांनी तरुणांचे आयकॉन खासदार उन्मेशदादा पाटील यांचे स्केच चित्र साकारत आज ही चित्रकृती खासदार उन्मेशदादा पाटील यांना भेट दिली.

आपली मतदारसंघ विकासाची धडपड आम्हा तरुणांसाठी प्रेरणादायी असून या भावनेतून आपले चित्र साकारले आहे. अशी भावना यश साळुंखे यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार उन्मेश दादा यांनी यश साळुंखे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत त्यांच्या वास्तू विशारद कलेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आभार मानले. याप्रसंगी मोदी फॉर पी एम ऑर्गनायझेशन तालुकाध्यक्ष गणेश पाटील, यश पवार, युवा मोर्चा पदाधिकारी कपिल पाटील, आरोग्यदूत बबडी शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content