बहिणाबाई कोवीड केअर सेंटरमध्ये हायपोक्लोराईची फवारणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील‍ बहिणाबाई कोविड केअर सेंटरसह इतर कोविड केअर सेंटरला महापालिकेच्या वतीने दररोज सोडियम हायपो क्लोराईड या जंतुनाशकाची दररोज फवारणी करण्यात येते. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे हे काम सातत्याने सुरूच आहे.

शहरातील सिव्हील हॉस्पिटल, अभियांत्रिकी महाविद्यालय, युनानी मेडिकल कॉलेज, शाहूनगर येथील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, जिल्हा उपकारागृह, काही पोलीस स्थानक आणि स्मशानभूमीत सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी जेटिंग मशीनद्वारे करण्यात येत आहे. सेंटरकडे जाण्याचा मार्ग, बाकडे, पायऱ्या तसेच रस्त्याच्या परिसरातही सॅनिटाईज केले जात आहे. यासाठी महापौर, आयुक्त, आरोग्यधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे कर्मचारी भिकन पेंढारकर, हेमराज कोल्हे, फारुख शेख आदी कार्यरत आहेत. खरं तर हे कर्मचारी ६ महिन्यांपासून सातत्याने याकामी व्यस्त आहेत. ती बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

सर्व बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यांच्या या कामाचे बहिणाबाई कोविड सेंटरचे पदाधिकारी प्रतिभाताई शिंदे, सचिन धांडे, चंदन कोल्हे, अभिजित महाजन, चंदन अत्तरदे, तुषार वाघुळदे, संदीप पाटील, पराग महाजन, राजेश पाटील, महेश चौधरी, भरत कार्डिले, चंद्रकांत नन्नवरे, प्रमोद पाटील, प्रवीण चौधरी, मिलिंद चौधरी, किरण वाघ, सुमित साळुंखे, कलिंदर तडवी यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाचे या अनमोल सहकार्याबद्दल बहिणाबाई कोविड केअर सेंटरतर्फे मनस्वी आभार मानण्यात आले आहे, असे जनसंपर्क व प्रसिद्धी विभागाचे तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.

Protected Content