संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क वाटप

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी महाराष्ट्र भर विविध जिल्हयात निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील गरीब गरजुंना मास्क व साबण आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील अशिक्षित, दुर्लक्षित व कोरोना संसर्गाचा अधिक धोका असलेल्या वस्तीत, दर्गा परिसरात ,गरजूंना मास्क व साबण आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. सद्य परिस्थितीत कोरोना महामारीपासून नागरिकांनी सुरक्षित राहण्या संदर्भात अॅड. आशा शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. दरवर्षी वाढदिवसानिमित्त मोठया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.. मात्र यंदा कोरोना विषाणूमुळे पूर्ण देश संकटात आहे. त्यामूळे सामाजिक बांधिलकी जपत संभाजी सेनेमार्फत वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी अॅड.आशाताई शिरसाठ, साधना शिरसाठ, अविनाश काकडे, रवींद्र शिनकर, राकेश पवार, अमोल पाटील, कृष्णा गवळी, सुनील ठाकूर, ऋषिकेश मोरे आदी उपस्थित होते.

Protected Content