केकेआरने सीएसकेला नमविले; तिसर्‍या स्थानावर झेप

अबूधाबी । चेन्नई सुपरकिंग्जला केकेआरने नमवत गुण तालिकेत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. तर सीएसकेचा हा तिसरा पराभव ठरल आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गडी राखून विजय मिळवत दिमाखदार पुनरागमन करणार्‍या चेन्नई सुपरकिंग्जला केकेआरने दणका दिला आहे. अबु धाबीच्या मैदानावर कोलकात्याविरुद्ध सामन्यात १६८ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

सीएसकेकडून सलामीवीर शेन वॉटसनने अर्धशतकी खेळी केली तर रायडूने ३० धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. पण, त्यानंतर मधल्या फळीने हाराकिरी केल्याने सीएसकेला पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईला विजयासाठी १२ चेंडूत ३६ धावांची गरज असताना जडेजा आणि केदार जाधव क्रिजवर होते. या दोघांनी १९ व्या षटकात १० धावा देत सुनिल नारायणने चेन्नईचे टेन्शन अधिक वाढवले. आता चेन्नईला अखेरच्या षटकात २६ धावांची गरज होती. पण, रसेलने या षटकात १५ धावा दिल्या आणि केकेआरने सामना १० धावांनी जिंकला.

केकेआरकडून सर्वच गोलंदाजांनी चांगला मारा करत सांघिक कामगिरीचे प्रदर्शन घडवले. मावी, नागरकोटी, चक्रवर्ती, नारायण, रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणार्‍या केकेआर कडून सलामीवीर राहुल त्रिपाठीने ८१ धावांची झुंजार खेळी केली.

Protected Content