कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव कटिबद्ध – पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे

     

पहूर, ता .जामनेर (रविंद्र लाठे) कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव कटीबद्ध असून अवैद्य धंद्यावाल्यांची गय केली जाणार नाही , असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी केले. पहूर पोलिस स्टेशनला दिलेल्या भेटीप्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. आज बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पहूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अंतर्गत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेत त्यांनी मुक्त संवाद साधून स्थानिक प्रश्नांविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींशीही संवाद साधला. कमानी पिंपळगाव तांड्या जवळ झालेल्या रस्तालूट प्रकरणी ‘चड्डी बाळ्या ‘ गँगचाही त्यांनी समचार घेतला. भेटीप्रसंगी पाचोरा उपविभागिय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे उपस्थित होते. या प्रकरणातील १ आरोपीस न्यायालयात जामीन मंजूर झाला असून उर्वरित दोघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस ठाण्यास  पुरेसे मनुष्य बळ उपलब्ध व्हावे, बसस्थानकावरील सीसीटीव्ह कार्यान्वीत व्हावे , पोलीस चौकी व्हावी , पोलीस ठाण्यास कंम्पाऊंड व्हावे , पहूरला पोलीस निरीक्षक दर्जाचे पद मंजूर व्हावे आदी प्रश्नांविषयी पत्रकार आणि लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. यावेळी शहर पत्रकार सघटने तर्फे मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, अमोल देवडे, माजी जि.प. कृषी सभापती प्रदीप लोढा , सरपंच पती रामेश्वर पाटील, रवींद्र मोरे, शैलेश पाटील,  किरण खैरणार , विश्वनाथ वानखेडे, राजू जेंटलमन  पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे, सचिव जयंत जोशी, मनोज जोशी, रविंद्र लाठे, रविंद्र घोलप, किरण जाधव, अतुल लहासे, गणेश मंडलिक यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content