किनगाव येथे जिल्हा परिषद सदस्या अरुणा पाटील यांच्या हस्ते पल्स पोलीओ कार्यक्रमाचा शुभारंभ

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे रविवार दि.२७ रोजी रूग्ण समिती अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्या अरूणा रामदास पाटील यांच्या हस्ते बालकाला पल्स पोलिओ डोस पाजून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

 

किनगाव तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २२ गावात एकूण ३५ पोलिओ बूथ ठेवण्यात आले होते. यात 0 ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना ३१६७ पोलिओ डोस देण्यात आले. .यावेळी तालुका आरोग्य अधिकारी तसेच किनगाव व साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा महाजन, द्वितीय वैद्यकिय अधिकारी डॉ.अमोल पाटील, आरोग्य सहाय्यक आर. आर. सुरवाडे, आरोग्य सहाय्यीका उषा पाटील आदी उपस्थित होते. या पत्स पोलीओ लसिकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पहाटे ४ वाजेपासुन सर्व गावांना लसी पोहचविण्याचे काम सुरु होते. तर सकाळी ८ वाजेपासून पोलिओ डोस देण्यास सुरूवात झाली. सामूहिक प्रयत्नांनी लसिकरण मोहीम यशस्वी झाली. यशस्वीतेसाठी आरोग्य सेवक डी. पी. तायडे, जे. के. सोनवणे, व्ही. बी. भिसे, डी. एम. बरडे, एम. बी. बारेला आरोग्य सेविका श्रीमती बी. एस. वारके, एम. एन .सोनवणे, के. जे .सपकाळे, एस. आर. जमरा, एन. एम. बारेला, प्रियंका महाजन, कनिष्ठ लिपिक महेश वाणी, वाहन चालक कुर्बान तडवी, परीचर सरदार कानाशा तसेच सर्व गटप्रवर्तक,आशा सेवीका अंगणवाडी सेवीका,मदतनीस व स्वयंसेवक यांचे पल्स पोलिओ मोहीमेच्या यशस्वीतेसाठी सहकार्ये लाभले.

Protected Content