छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात पोलीओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते रविवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलीओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.

 

जिल्हाभरात पोलिओ लसीकरण करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे  जळगाव शहरात  रविवारी छत्रपती २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शाहू महाराज रूग्णालयात महापौर जयश्री महाजन यांनी दीपप्रज्वलन करीत पोलीओ लसीकरण मोहिमेस सुरूवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी डॉ. उगले मॅडम यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारीका यांची उपस्थिती होती. यावेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, प्रत्येक पालकाने पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा. एकही मुलाला पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ लस पाजून यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. यानंतर रुग्णालयातील नवजात शिशु कक्षातील बालकांना पल्स पोलिओ डोस पाजण्यात आला. त्यानंतर प्रत्येक बालकाला लस पाजल्याची डाव्या हाताच्या करंगळीवर खूण करण्यात आली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/483513150150062

 

Protected Content