विद्यापीठात राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान ‘हवामान बदल’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

वेबिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरु प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे हे राहणार असून पुणे येथील सेंटर फॉर एन्व्हारमेंट एज्युकेशनचे प्रोग्राम डायरेक्टर सतिश आवटे मार्गदर्शन करणार आहेत. वेबिनारचे मुख्य आयोजक विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, युनिसेफच्या संवाद विशेषतज्ज्ञ स्वाती मोहपात्रा, माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये तर सहआयोजक डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे हे आहेत.

हा राज्यस्तरीय वेबिनार झूम अॅपवर घेण्यात येणार आहे. वेबिनार सर्वासाठी नि:शुल्क असून यात सहभागी होण्यासाठी झूम आयडी 9423490044 व mcj111 हा पासवर्ड वापरून लॉगिन करता येईल. वेबिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी केले आहे.

Protected Content