दुरदर्शन टॉवरनजीक अपघात; दुचाकीवरील दोघे जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दुरदर्शन टॉवर जवळ झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली आहे. यात एकाची प्रकृती गंभीर असून त्याला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव-भुसावळ रोडवरील दुरदर्शन टॉवर नजीक बोदवडकडून येणारी दुचाकीने ओव्हरटेक करतांना समोर आल्याचे पाहून समोरून येणाऱ्या बस (एमएच १४ बीटी ००९८) वरील चालकाने दोघांना वाचविण्याच्या प्रयत्न केला. परंतू दोघांना वाचवितांना दुचाकीला कट लागला आणि बस थेट रस्त्यावरून खाली उतरत बाजूच्या शेतात घुसल्याची घटना रविवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या विचित्र अपघातात दुचाकीवरील कडू बावस्कर (वय-२७) आणि भुरा राजपूत (वय-२३) दोघे रा. नाडगाव ता. बोदवड हे जखमी झाले. दोघांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमीतील कडू बावस्कार याचा प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content