बोहल्यावर चढण्याऱ्या वधू-वरांनी पाडळसरे प्रकल्पासाठी प्रशासनाला लिहिली पत्रे!

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेरसह ६ तालुक्याच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रक्लप असलेले पाडळसे धरण गतीमानतेने पूर्ण व्हावे यासाठी जन आंदोलन समितीच्या ५१ हजार पत्र लेखन आंदोलनात ठिकठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून जानवे येथे हळदीच्या समारंभात वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींनी देखील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या नावे धरणासाठी पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे तर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनीही मासिक सभेत पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.

जानवे येथिल माजी सरपंच भटू पाटील यांचे सुपुत्र शुभम भटू पाटील व श्रीराम गंगाराम देवरे यांची कन्या चिसौका गायत्री यांनी हळदमध्ये पाडळसे धरनासाठी वेळ काढून राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या नावे पत्र लिहून आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले. शिवधर्म पद्धतीने पार पडलेल्या या हळदीच्या लग्न सोहळ्यात आर बी पाटील, सौ.वसुंधरा लांडगे यांनी विधिवत कार्य पार पाडतांना सामाजिक योगदान देण्याचा आदर्श वधू-वर यांनी त्यांच्या नातेवाईक मंडळींसह निर्माण केला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते प्रा शिवाजीराव पाटील,विश्वास पाटील, मा.सभापती श्याम अहिरे , माजी सरपंच रावसाहेब पाटील,सौ रुपाली पाटील,दिनेश पाटील यांचेसह आजी माजी ग्रां प चे पदाधिकारी उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी च्या सचिवांनी देखिल बैठक घेवून शासनाच्या नावे शेकडो पत्र लिहून समितीच्या पदाधिकऱ्यांजवळ सुपूर्द केले.याप्रसंगी समितीचे सुभाष चौधरी,हेमंत भांडारकर यांनी मार्गदर्शन केले तर गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय शेखनाथ पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. भगवान पाटील, युवराज पाटील, रतिलाल पाटील, कैलास पाटील आदींसह मोठ्यासंखेने सचिव उपस्थित होते.

Protected Content