Home आरोग्य विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई (व्हिडिओ )

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई (व्हिडिओ )

0
58

 

जळगाव, प्रतिनिधी ।कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या पथकातर्फे विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेच्या पथकातर्फे आज सुभाष चौकात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मागर्दर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी दंड भरण्यावरून पथकाशी हुज्जत घातल्याचे पहावयास मिळाले. तर एकाची दुचाकी महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी उचलून घेतल्याने या तरुणाने तो दंड भरण्यास तयार असतांना देखील कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी जप्त केल्याची तक्रार केली. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. तर पालिका कर्मचाऱ्यांनी ते त्याच्याकडे रीतसर दंड भरण्याचे सांगत असतांना देखील त्याने दंड न भरल्याने ही कारवाई करण्यात आले असल्याचे सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना खबरदारीचा उपाय म्हणून विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर प्रत्येकी २०० रुपयांचा दंड करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त श्री. वाहुळे यांनी नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्क वापरावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन केले आहे.

 


Protected Content

Play sound