बंजारा समाजाच्या वधू-वर मेळाव्यासाठी नोंदणीचे आवाहन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बंजारा समाजातील वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेने केलेले आहेत. यासाठी इच्छुक वधु-वरांनी मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेने केले आहेत.

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या संख्येने बंजारा समाजात एकवटलेला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ओढरे येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच विविध उपक्रम राबविणाऱ्या ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून बंजारा समाजातील वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन येत्या काही दिवसांतच करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या वधु-वर परिचय मेळाव्यात बंजारा समाजातील वधु-वरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड यांनी केले आहे. या नोंदनिद्वारे इच्छुकांचे फोटो व तपशील असलेली सूची पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात परिचय पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर पुस्तिकामुळे पालकांना वधू- वर शोधण्यासाठी फारसी कसरत करावी लागणार नसल्याचे अशोक राठोड यांनी सांगितले आहे.

Protected Content