..अन्यथा २ ऑक्टोबरला आत्मदहन – चंद्रकांत सोनवणे

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मुंदाणे प्र. ऊ. ग्रामपंचायतीला सन २०११-१२ मध्ये मिळालेला निधी ग्रा.पं. तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व तंटामुक्त अध्यक्ष यांनी सदर निधीचा अपहार व गैरव्यवहार केला आहे. यासंदर्भात चौकशी केली असता गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र  याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल नाही.  येत्या १ ऑक्टोबरपर्यंत संबधितांवर  गुन्हा दाखल न केल्यास  २ ऑक्टोबरला आत्मदहनाचा  इशारा चंद्रकांत सोनवणे यांनी प्रशासनास निवेदनाव्दारे दिला आहे.

ग्रामपंचायत गैरव्यवहार बाबत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी तटस्थ चौकशी अधिकारी म्हणून एरंडोल पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांना चौकशीसाठी सन 2016 मध्ये नेमणूक केली होती. सदर गट विकास अधिकारी एरंडोल यांनी चौकशी केली असता ग्रामपंचायत मुंदाने येथील सरपंच ग्रामसेवक अध्यक्ष यांनी तंटामुक्त बक्षीस निधीतून पैसे बेकायदेशीर गैरव्यवहार केला आहे, तसेच निधीचा दुरुपयोग केला बँकेतून परस्पर पैसे काढून आर्थिक अपहार भ्रष्टाचार केलेला आहे .असे प्रथमदर्शनी चौकशी अहवाल दिला आहे. व तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक ह्या दोषींवर गुन्हा

दाखल करावा असा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 2016 मध्ये लेखी सादर केला आहे.त्या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी सन 2017 मध्ये पारोळा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना संबंधित तंटामुक्त निधि गैरव्यवहार संबंधित तात्काळ कारवाई बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता ,परंतु संबंधित पारोळा पंचायत समितीमधील विस्ताराधिकारी सदर तंटामुक्त बक्षीस निधीं गैरव्यवहार प्रकरण व वरिष्ठ अधिकारी यांचे कारवाई चे आदेश दडपून ठेवले आहेत, व पदाचा गैरवापर करून दप्तर दिरंगाई केली आहे. करीत आहे. म्हणून अशा भ्रष्ट पदाधिकारी व जबाबदार अधिकाऱ्यांवर व विस्ताराधिकारी यांच्यावर 1 आक्टोंबर पर्यंत गुन्हा दाखल करावा. न केल्यास 2 आक्टोंबर रोजी आत्मदहन करणार आसे लेखी निवेदन प्रशासनाला दिले आसल्याचे चंद्रकांत सोनवणे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

 

Protected Content