धरणगाव तालुक्यात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पाहणी

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी २ एप्रिल रोजी धरणगाव पंचायत समितीसह धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची तसेच घरकुलच्या कामांची पाहणी केली. त्यांनी कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

मीनल करनवाल यांनी घरकुल योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच, त्यांनी शौचालय बांधकामाची कामे आणि स्वच्छता विषयक पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. त्यासोबतच, मीनल करनवाल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन नागरिकांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या औषधींचा साठा आणि रुग्णांना वाटप करण्यात येत असलेली औषधी यांची माहिती जाणून घेतली. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची अखेर आटोपल्यानंतर मीनल करनवाल यांनी तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी अचानक भेट सत्र सुरू केल्याने जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट मोडवर दिसून आले.

Protected Content