Home क्रीडा आज रंगणार उपांत्य फेरीची पहिली लढत; भारताचा न्यूझिलंडविरूध्द सामना

आज रंगणार उपांत्य फेरीची पहिली लढत; भारताचा न्यूझिलंडविरूध्द सामना

0
47
kohli williamson


kohli williamson

मॅन्चेस्टर वृत्तसंस्था । विश्‍वचषकातील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आज भारताची लढत न्यूझिलंडविरूध्द होत असून या सामन्यासाठी क्रिकेट शौकिनांनी उत्सुकता शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे.

भारतीय संघाने एक अपवाद वगळता सर्व साखळी सामने जिंकून अतिशय धडाकेबाज पध्दतीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे न्यूझिलंडचा संघदेखील बलवान असल्यामुळे याला कमी लेखून चालणार नाही. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर हा सामना रंगणार असून यात नाणेफेक हा अतिशय महत्वाचा मुद्दा राहणार आहे. किवीजच्या संघाची गोलंदाजी अतिशय धारदार असून फलंदाजी तुलनेत थोडी कमकुवत आहे. फलंदाजीची मदार केन विल्यमसनवर जास्त प्रमाणात आहे. भारताचा संघ संतुलीन आहे. मात्र न्यूझिलंडच्या धारदार मार्‍यासमोर भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे. यामुळे हा सामना चुरशीचा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound