किनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात ग्रामीण क्षेत्रातील शेकडो युवकांचा व महिलांचा प्रवेश सोहळा संपन्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रखर व सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्यास असणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील शेकडो युवक व महिलांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ व जुगल पाटील, यावल तालुका अध्यक्ष रितेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे यावल तालुका अध्यक्ष आकाश फेगडे, चोपडा शहराध्यक्ष गिरीश देशमख, यावल तालुका कार्यध्यक्ष जितेन्द्र सोनवणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य नाना सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष नारायण पाटील यांच्यासह पक्षाचे विविध विभागाचे पदाधिकारी या प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

यावेळी पक्ष प्रवेश मेळाव्यास उपस्थित कार्यकर्त्याना पक्षाची भुमिका मांडतांना जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगीतले सकाळच्या ६ वाजेपासून लोकहिताचे समाजपयोगी व विधायक काम करणारे अजितदादा हे एकमेव नेते आहेत व याचा आम्हास अभिमान आहे. पक्षाची भुमिका सर्वसामान्यांपर्यंत स्पष्ठ व्हावी, याकरीता पक्षाच्या वतीने संपुर्ण राज्यभरात यशस्वीरित्या संपर्क अभियान राबविण्यात आल्याचे या जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगीतले. या पक्ष प्रवेश सोहळ्यात यावल तालुक्यासह यावल शहर, चिंचोली, मालोद, वाघझिरा, नायगाव, किनगाव,यावल येथील अल्पसंख्यांक महिला कार्यकर्ता व इतर गावातील युवक व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात प्रवेश केला. या प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जुगल पाटील यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष रितेष पाटील यांनी मानले.

Protected Content