Home राजकीय तुमच्या मुलाकडे इतके पैसे कोठून आले ? : ममतांचा अमित शाहांना प्रश्‍न

तुमच्या मुलाकडे इतके पैसे कोठून आले ? : ममतांचा अमित शाहांना प्रश्‍न

Mamata Amit Shah
Mamata Amit Shah

 

 

 

 

कोलकाता वृत्तसंस्था । अमित शाह यांनी आत्या-भाचा वरून टीका केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ”तुमच्या मुलाकडे इतके पैसे कोठून आले ?” असा प्रश्‍न विचारत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

कोलकातामध्ये  एका कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जींनी अमित शाहांवर हल्लाबोल केला. तुम्ही सातत्याने आमच्यावर आत्या-भाचा नात्यावरून टीका करता. मात्र तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी विचारला. अमित शाहा  यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या भाषेमधून अहंकाराचा वास येतो. अशी भाषा एका केंद्रीय गृहमंत्र्याला शोभत नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच

 

 

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यात गुंडगिरी आहे. बंगालला शांततेत राहू द्या. राज्यामध्ये भाजपाची सत्ता येऊ देता कामा नये. मी सर्वांना बंगालच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन करते. मी भाजपाला घाबरत नाही. मी रस्त्यावर उतरून लढणारी महिला आहे. मी अखेरपर्यंत संघर्ष करेन.


Protected Content

Play sound