किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामाच्या ठिकाणी दोन जणांना काहीही कारण नसतांना चौघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी १० मार्च रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, किरण विजय सुरवाडे वय ३० रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा त्याच्या सहकारी गोविंदा काळे याच्या सोबत रविवारी १० मार्च रोजी ११.३० वाजेच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. त्यावेळी इच्छाराम पुंडलिक वाघोदे, पुंडलिक वाघोदे आणि इतर अनोळखी दोन जण असे चौघांनी काहीही कारण नसतांना लाकडी दांडक्याने किरण सुरवाडे आणि गोविंदा काळे यांना बेदम मारहाण केली. तसेच पोलीसात तक्रार दिल्यास जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर किरण सुरवाडे याने रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता मारहाण करणारे इच्छाराम पुंडलिक वाघोदे, पुंडलिक वाघोदे आणि इतर अनोळखी दोन जण सर्व रा. समता नगर, जळगाव यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Protected Content