जळगाव शहरात बजरंग दलाच्यावतीने शौर्य संचलन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विश्व हिंदू परिषद आणि जळगाव जिल्हा बजरंग दलातर्फे शौर्य संचलनाचे आयोजन रविवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी बहिणाबाई चौधरी गार्डनजवळील महाराणा प्रताप चौक येथे करण्यात आले होते. याठिकाणी जिल्हाभरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रामाच्या सुरूवातीला महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती यांच्या हस्ते भगवाना प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे तर भारत मातेच्या प्रतिमेचे नगसेविका शुचिता हाडा, अतुल हाडा यांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते अखिल भारतीय धर्म जागरणचे सहमंत्री ॲड. दिपकराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. शौर्य संचलनास बहिणाबाई गार्डन येथून प्रारंभ होऊन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, स्वातंत्र्यवीर सावकर चौक, नवीन बस स्थानक, स्टेट बँक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक मार्गाने समारोप शेठ ला. ना. शाळेच्या मैदानात करण्यात येणार आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीष मुंदडा, जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, महानगराध्यक्ष डॉ. मनिष चौधरी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4967474439930076

 

Protected Content