दरेगावाकडे जाणाऱ्या बसचा अपघात; चालकासह दहा जखमी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चाळीसगाहून दरेगावकडे जाणाऱ्या एका बसचा रस्त्यात अचानक अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात चालकासह दहा जण जखमी झाल्याचे कळते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगावहून दरेगावकडे एस.टी महामंडळाची बस जात असताना भोरस फाट्याजवळ एक आयशर उभा होता. त्या आयशरला मागून बसने जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात चालकासह इतर नऊ जण जखमी झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र जखमी झालेल्यांनी पुढील औशोधोपचारासाठी आपल्या सोईनुसार रुग्णालयात दाखल झाले आहे. परंतु या घटनेविषवी अद्यापही चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झालेली नाही.

Protected Content