जेडीयू मंत्रिमंडळात सहभागी होणारी नाही : मुख्यमंत्री नितीश कुमार

D70Swe8UYAAyCtV

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने जनता दल युनायटेड पक्ष नाराज झाला आहे. आमच्या पक्षाचा कोणीही खासदार मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे जेडीयूचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मंत्रिमंडळात नसलो तरी आम्ही एनडीएसोबतच आहोत हे मात्र, त्यांनी स्पष्ट केले आहे. नितीश कुमार स्वत: राष्ट्रपती भवनातील पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळयाला उपस्थित रहाणार आहेत. त्यांनी जेडीयूला फक्त एक मंत्रीपद देऊ केले. हा फक्त सरकारमध्ये प्रतीकात्मक सहभाग झाला. आम्हाला गरज नाही हे आम्ही त्यांना कळवले. हा मोठा मुद्दा नाही. आम्ही एनडीएमध्येच आहोत आणि निराशही नाही. आम्ही एकत्र काम करु असे नितीश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, या निमित्ताने शपथविधीपूर्वीच भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मतभेद समोर आले आहेत.

Add Comment

Protected Content