एरंडोल तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत २४ अर्ज अवैध तर ८३९ वैध

एरंडोल । तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी छाननी होऊन एकूण २४ अर्ज अवैध घोषित करण्यात आले तर ८३९ अर्ज वैध झाल्याचे जाहीर करण्यात आले.

ग्रामपंचायत निहाय अवैध अर्जांची संख्या पुढील प्रमाणे :- 

खर्चे बुद्रुक ०१, कासोदा ०२, वैजनाथ ०१, तळई ०९, निपाने ०३, खडके खुर्द ०८ दिनांक ४ जानेवारी रोजी  माघारीची अंतिम मुदत असून माघारी नंतरच खरे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान  छाननी त्यादिवशी काही ग्रामपंचायती काही जागा बिनविरोध झाल्याचे मानण्यात येत आहे. त्यांची बिनविरोध निवड माघारीनंतर घोषित होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार  एकूण ११ सदस्य पदाच्या जागा या शिवसेनेला प्राप्त झाले आहेत असा दावा त्यांनी केला आहे. त्यात बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे गालापूर परवीनबी शेख आरिफ, रेखा सतीश चौधरी, निपाने नीलिमा समाधान ठाकूर, ताडे सचिन पंडित पाटील, उत्राण(गु.ह) मनीषा जितेंद्र महाले, माधुरी मंगल सोनवणे, टाकरखेडा सुनील संतोष पाटील, देवकाबाई फकीरा जाधव, टोळी कमलबाई मोहन भिल, कल्याणी संजय मराठे आदींचे नाव आहेत. 

 

Protected Content