कोरोनामुळे दिल्लीत ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  दिल्लीत ६९ वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला होता. मयत महिला कोरोनाग्रस्त असल्याची माहिती शुक्रवारी समोर आली. त्यामुळे आता भारतात कोरोनामुळे मयत झालेल्यांची संख्या दोनवर पोहचली आहे.

 

मयत महिलेला परदेशातून परतलेल्या मुलापासून संसर्ग झाला होता. मात्र, विमानतळावर स्कॅनिंगमध्ये मुलाला व्हायरसचे निदान झाले नव्हते. दरम्यान, हरियाणा, महाराष्ट्रात नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा ८१ वर गेला आहे. तर महाराष्ट्राच्या ५ शहरांत, सिनेमागृहे, पब व नाइट क्लबही बंद कार्नायचे आदेश देण्यात आले आहेत.

Protected Content