लेवा गणबोली साहित्य संमेलनाची आढावा बैठक उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । दुसर्‍या लेवा गणबोली साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत कवयित्री बहिणाबाई उद्यानात आढावा बैठक पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक, इतिहासकार व लेवा गणबोली शब्दकोश कार डॉ.नीळकंठ पाटील ( डोंबिवली) हे होते. बैठकीच्या प्रारंभी कवयित्री बहिणाबाईंच्या पुतळ्यास उपस्थित साहित्यिक व प्रेमींनी वंदन केले. यावेळी साहित्य संमेलनात होणार्‍या परिसंवाद, चर्चासत्र आणि इतर तयारीबाबत सांगोपांग चर्चा झाली. संयोजक तुषार वाघुळदे यांनी आतापर्यंतचा अहवाल व विविध समित्यांची माहिती सांगितली. तसेच कार्याध्यक्ष तथा व.वा.वाचनालयाचे संचालक डॉ.प्रभात चौधरी यांनी संमेलनाच्या पुढील नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. तर जेष्ठ साहित्यिक डॉ.अरविंद नारखेडे आणि प्रा.संध्या महाजन यांनी वक्ते आणि संमेलनात घेण्यात येणार्‍या कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांना सांगितली.

चर्चेत लिलाधार कोल्हे, संजय पाटील, अशोक पारधे , शीतल पाटील आणि गोविंद पाटील यांनी सहभाग घेऊन विविध सूचनाही मांडल्या. संमेलनाध्यक्ष डॉ.नी. रा.पाटील यांनी या संमेलनात घेण्यात येणार्‍या ठरावावर आपले मत व्यक्त करून संमेलनाच्या तयारीबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी खंडवा ( म.प्र.) येथील कवयित्री शरयू खाचणे, अरूण कुमार जोशी, पार्थ खाचणे, सुनिल पाटील, सुधीर चौधरी, तुषार वाघुळदे, प्रभात चौधरी, संदीप नेमाडे आदींची उपस्थिती होती. संमेलन जळगाव येथे २९ मार्चला जळगावी होणार आहे. संमेलनाचे जेष्ठ मार्गदर्शक प्राचार्य व जेष्ठ लेखक डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी असून स्वागताध्यक्ष पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील तसेच कार्यवाह सेवाभावी व्यक्तिमत्त्व किसन वराडे हे आहेत.साहित्य संमेलनात साहित्यविषयक भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.अनेक साहित्य प्रेमींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Protected Content