ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे पवारांना पराभवाची चाहूल लागलीय : चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

 

chandrakant patil

 

जळगाव (प्रतिनिधी) जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, अस धक्कदायक वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यावर पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जळगावामध्ये दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

 

बारामतीची जागा जर भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. त्यासंदर्भात बोलताना पाटील पुढे म्हणाले की, ईव्हीएम काँग्रेसनेच आणले. ४ राज्यात भाजपचा पराभव झाला तेव्हा यांना ईव्हीएम चालले. पण भाजपचा विजय झाला की ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे सांगितले जाते. शरद पवारांनी सर्व गोष्टींचे जपून विश्लेषण करावे. सर्व विश्लेषण त्यांच्या अंगाशी येत आहेत. पवार कुटुंबातील एकही उमेदवार निवडून येणार नाही, हे मी ठामपणे सांगतोय. आता सातत्याने मला लक्ष्य करून आरोप प्रत्यारोप करत आहेत. बारामतीमध्ये त्यांची मुलगी तसेच मावळात नातू हरणार आहे,असे देखील ना.पाटील म्हणाले.

 

Add Comment

Protected Content