बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्याला अटक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दशरथ नगर येथे घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील दोन मोबाईल लांबविणाऱ्या संशयिताला शनिपेठ पोलिसांनी शुक्रवार, ७ ऑक्टोंबर रोजी अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गजानन अर्जून पाटील रा. भराडी. ता जामनेर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

दशरथ नगर येथे संजय बाबुराव पाटील वय ५१ हे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता संजय पाटील हे घराला कुलूप लावून कामानिमित्ताने निघून गेले होते. यादरम्यान गजानन पाटील या तरुणाने घर बंद असल्याचे संधी साधत पेन्चीसच्या सहाय्याने घराचे कुलूप तोडले. यानंतर घरात जावून घरातील ९ हजार २०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरले. दरम्यान याचवेळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर गजानन पाटील यास नागरिकांनी पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी संजय पाटील यांच्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून गजाजन पाटील यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.

Protected Content