अमेरिकेच्या निर्णयामुळे चीनची डोकेदुखी वाढणार

 

बीजिंग: वृत्तसंस्था । अमेरिकेने अफगाणिस्तानबाबत घेतलेल्या निर्णयामुळे चीनची डोकेदुखी वाढणार आहे. अमेरिेकेने सैन्य माघारी घेतल्यास उइगर दहशतवाद्यांच्या कारवाया वााढण्याची चीनला भीती आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानमधूम टप्प्याटप्प्याने आणखी सैन्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने योग्य पद्धतीने आणि जबाबदारी ओळखून हा निर्णय अंमलात आणावा असे आवाहन चीनने केले आहे. अफगाणिस्तान व चीनची सीमा झिंजियांग प्रांतात एकत्र येते.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, अफगाणिस्तानमधून व्यवस्थित आणि जबाबदारीने सैन्या माघारी घेतले जावे असे आवाहन चीनने केले आहे. त्या ठिकाणी दहशतवाद्यांना बळ मिळता कामा नये. त्याशिवाय अफगाणिस्तानमधील शांततेच्या प्रक्रियेत योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काबुलमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध चीनने केला.

दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या आणि स्थैर्य, सुरक्षितेसाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांच्या बाजूने चीन उभा असल्याचे लिजियान यांनी म्हटले. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यास तिथली परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्याशिवाय उइगर दहशतवाद्यांना आणखी बळ मिळू शकते, अशी भीती चीनला वाटत असल्याचे म्हटले जात आहे.

मागील आठवड्यात अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. अफगाणिस्तानमध्ये सध्या अमेरिकेचे ४५०० सैनिक असून जानेवारी महिन्यात ही संख्या २५०० इतकी कमी करण्यात येणार आहे.

Protected Content