नूतन उपमहापौर सुनील खडके जळगावकरांच्या भेटीला ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । नूतन उपमहापौर सुनील खडके हे जळगावकरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाऊन घेत आहेत. यात आज त्यांनी जुन्या खेडी रोडवरील विविध कॉलन्यांमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.

सुनील खडके यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जळगावातील विविध प्रभागांमध्ये भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे. आज या उपक्रमाच्या तिसर्‍या दिवशी त्यांनी जुने जळगाव, कोळी पेठ, मेस्को माता नगर, जुना आसोदा रोड, जुना खेडी रोडी, ज्ञानदेव नगर, योगेश्‍वर नगर, तळेले कॉलनी आदी भागांमधील नागरिकांशी वार्तालाप केला. याप्रसंगी त्यांच्या सोबत नगरसेविका सुचीता हाडा, रंजना सपकाळे, मीनाक्षी पाटील, नगरसेवक प्रवीण कोल्हे, अमित काळे, पिंटू काळे, भरत सपकाळे आदींसह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा उपमहापौर खडसे यांच्या जळगावकरांशी वार्तालापाचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/739607823321891

Protected Content