शेंदूर्णी नगरपंचायत २०२१ स्वच्छ सर्वेक्षण मूल्यमापन निकाल जाहीर

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २०२१ चे मूल्यांकन जाहीर केले आहे. यात शासकीय कार्यालयात शेंदुर्णी नगरपंचायतने प्रथम क्रमांक पटकाविला. 

बाजार समित्यांमध्ये कृषी उत्पन्न उपबाजार समिती, शाळांमध्ये गरुड हायस्कुल, होटल्स मध्ये साईदीप, हॉस्पिटल मध्ये ममता हॉस्पिटल आणि रहिवास क्षेत्रात दत्त नगर परिसराने स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विभाग प्रमुख सुहेब काजी व  शहर समन्वयक लोकेश साळी यांच्या मार्फत गुणांकनाचे परीक्षण करण्यात आले. त्यात शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या वतीने देशभरात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा राबविण्यात येत आहे. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्रातही ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. शेंदुर्णी  शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगरपंचायतनेही स्वच्छ सुर्वेक्षण २०२१ ची अंमलबजावणी सुरु केली आहे. या  विजेत्या नगरपंचायतचे नगराध्यक्षा विजयाताई  खलसे यांना प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल व सर्व नगरसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात दिनेश कुमावत व  विठ्ठल पाटील यांचे  सहकार्य लाभले.

Protected Content