डांभुर्णी जिल्हा परिषद शाळा अव्वल ; प्रेरणादायींचा बुधवारी सत्कार

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने १६ कलमी कार्यक्रमांतर्गत यावल तालुक्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. यानिमित्ताने बुधवार दि. २३ मार्च रोजी ग्रामस्थ व सामजिक संस्थांच्या माध्यमातून संबंधितांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावल तालुक्यात डांभुर्णी येथील जिल्हा परिषदची शाळा प्रथम आली आहे. आता या पुढचं उद्दिष्ट जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या शाळामंध्ये प्रथम येण्याचं संकल्प डोळ्यासंमोर ठरवून शिक्षक आणि संबंधित यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. त्यासाठी त्यांचा उत्साह वाढावा व इतर शाळांना ही त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या विचारातून अगोदर मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येणार आहे. शाळेच्या या सर्वांगीण सुधारणे कामी ज्या ग्रामस्थांनी, शिक्षकांनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी योगदान दिले आहे त्यांचे यथोचित सन्मान होणं क्रमप्राप्त आहे. विशेषतः ज्यांच्या आर्थिक योगदाना शिवाय हे शक्य नव्हतं असे सर्व गावातील दानशूर मान्यवरांचा देखील सत्काराचा कार्यक्रम दि. २३ मार्च रोजी स्वयंदीप प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे. तरी या शैक्षणिक कार्यात उल्लेखनिय कार्याचे कौत्तुक करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थी पाल्यांनी कार्यंक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, डांभुर्णी जिल्हा परिषद शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिपा यांनी नुकतीच भेट देवुन शाळेअंतर्गत शासनाची १६ कलमी कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याची पाहणी केली.  यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीच्या मावळ्त्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, तालुका गटशिक्षण अधिकारी एन. ए. शेख, सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष व डांभुर्णीचे उपसरपंच पुरूजीत चौधरी, स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते .

Protected Content