२० जानेवारीपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार-सामंत

मुंबई : वृत्तसंस्था । येत्या २० जानेवारीपर्यंत ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील एरव्ही विद्यापीठातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी आज जाहीर केले.

उदय सामंत यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे उदय सामंत म्हणाले. प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे व सहायक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Protected Content