शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करावा- भरत शिरसाठ

chalisagaon teacher

चाळीसगाव प्रतिनिधी । समता शिक्षक परिषद माध्यमिक विभाग शाखेच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 हे भारताच्या शैक्षणिक, समाजिक, आर्थिक, राजकीय, व सांस्कृतिक अशा विविध शैक्षणिक धोरणावर चर्चासत्राचे आयोजन भूषण मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

अशा सर्व अंगांमध्ये खूप मोठा बदल घडवून आणणार असून एक शिक्षक म्हणून त्याचा सखोल अभ्यास व चिंतन केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी येथील भूषण मंगल कार्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आयोजित केलेल्या चर्चासत्र प्रसंगी केले. तसेच धोरणावर अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करत म्हणाले की, सद्याचा कोठारी कमिशने सुचवललेला १०+२+३ हा आकृतिबंध रद्द करण्यात येत असून नवीन शैक्षणिक धोरणात ५+३+३+४ असा आकृतिबंध समाविष्ट करण्यात आला आहे. अंगणवाडीचे वर्ग प्राथमिकला जोडणार आहे., नववी ते बारावी असा माध्यमिक गट असणार आहे. 2030 पर्यंतच एक किंवा दोन वर्षाचे बीएड केलेले उमेदवार पात्र असणार आहेत. यापुढे 4 वर्ष असलेले एकात्मिक बीएड मान्य केले जाणार आहे. स्कूल कॉम्प्लेक्स नावाची नवी संकल्पना येत असून यामुळे शिक्षण क्षेत्रात बरीच उलथापालथ होणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक सेवा संरक्षणाच्या अनुषंगाने व समाजातील अनुसूचित जाती-जमाती व वंचित घटकाच्या विद्यार्थ्यांकरीता सकारात्मक तरतुदी नव्याने अंतर्भूत होणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड, संघटनेचे राज्य पदाधिकारी राज्य सचिव संतोष गवई, धनराज मोतीराय, सुभाष मस्के, सतीलाल शिरसाट, संघटनेचे विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप, जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष बी.एन.पाटील, जिल्हा सचिव रणजीत सोनवणे, टी.बी.पांढरे, सोपान भवरे, अजय भामरे, ईश्वर आहिरे, महिला जिल्हाध्यक्षा छाया बैसाणे आदी उपस्थित होते. माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी व मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवीन शैक्षणिक धोरण हे दुरदर्शी जरी असले तरी विद्यार्थ्यावर जीवघेणे प्रयोग करणारे नसावे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेचे प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड यांनी सांगतिले. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक सदर चर्चासत्रास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी तर सूत्रसंचालन संघटनेचे तालुका उपाध्यक्ष वाय.टी.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.ए.जाधव, दिनेश पगार, मिलिंद भालेराव, बाळकृष्ण मालपुरे, हेमंत देवरे, जनार्दन सानप, जी.व्ही.बोरसे, सुशील सोनवणे, दिनेश जगताप, मिलिंद जावळे, अफसर खाटीक, शकील खाटीक यासह संपूर्ण तालुकातील कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

Protected Content