मुंबईत पहिली ते नववी शाळा बंद – दहावी, बारावीचे वर्ग मात्र सुरूच

मुंबई वृत्तसंस्था | दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यातच ओमायक्रॉनचं वाढत जाणारं संकट यामुळे मुंबईत पहिली ते नववी शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा विचार करता विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र प्रत्यक्ष सुरूच राहणार आहे.

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा आणि अकरावीचे वर्गही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरूच राहणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा विचार करता विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र प्रत्यक्ष सुरूच राहणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी घेण्यात आला आहे.

पहिली ते आठवीसह नववी आणि अकरावीच्या वर्गसुद्धा बंद राहणार आहे. या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. फक्त दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा विचार करता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा सुरू राहणार आहे. उद्यापासून ते 31 जानेवारीपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Protected Content