डॉ.उल्हास पाटील रक्‍तपेढीत रक्‍तदान उपक्रमाद्वारे महिला दिन साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार, ८ मार्च रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

यात विद्यार्थीनींसह महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्‍तदान करुन महिला दिन साजरा केला.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनी गौरी लोहारे, धनश्री कांबळे, पूजा वंजारी, अक्षता साभोळकर, जांभळकर, काजल सोनटक्के, अश्विनी मुन यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थीनींच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी कौतुक केले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे डॉ.नितीन भारंबे, रक्तपेढी समन्वयक लक्ष्मण पाटील, टेक्निशन अमोल चौधरी, शेख सर, निगार खान, ज्योती आरसे, यश पाटील, विक्की बागुल यांनी परिश्रम घेतले.

Protected Content