गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल ; ऐश्वर्य चोपडा प्रथम

जळगाव प्रतिनिधी । इयत्ता दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून ऐश्वर्य चोपडा ह्या विद्यार्थ्याने ९७.४७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटाकाविला आहे. 

गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही कायम असून स्कूलमधून दहा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांवर गुण मिळविले आहे. यात स्कूलमधून द्वितीय क्रमांक रिया मनोज अग्रवाल ९६.८ टक्के, तृतीय पारितोष सुशिल थोरात ९४.४ टक्के, चर्तुथ हिमांशु किशोर खंडेलवाल ९४.२ टक्के, पाचव्या क्रमांकावर विनीता भारत पाटील ९३.६ टक्के, सहाव्यास्थानी भुमिका राजेशकुमार पाटील ९२.४ टक्के, सातव्या क्रमांकावर खुशी अमोल चौधरी ९२.२ टक्के, आठवा निकीता संजय पाटील ९१.६ टक्के, नववा सारा शरीफ पटेल ९१.६ टक्के आणि दहाव्या क्रमांकावर ओम राजकुमार मिश्रा ह्या विद्यार्थ्याने ९१.२ गुण मिळविले आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, मुख्याध्यापिका निलीमा चौधरी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Protected Content