एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जळगाव शहरातील पार्वती नगरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामानंद नगर रोडवरील पर्वती नगरात एचडीएफसी बँकेचे एटीएम लावण्यात आले आहे. या ठिकाणी बुधवारी २८ मार्च रोजी दुपारी १ वाजता शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याचे समोर आले. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. या आगीत सीसीटीव्ही फूटेज, कॅमेरा, सेंसर प्लायवूड, फर्निचर, आणि कॅबीनेचे असे एकुण अंदाजे २० हजार रूपये किंमतीचे नुकसान झाले आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या आगी संदर्भात रामदास चव्हाण यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Protected Content