वृध्द महिलेला चौघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे वृध्द महिलेला पाणीपट्टी भरण्याच्या कारणावरून तिच्या घरातील सदस्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सादीका युसूफ खान (वय-५९) रा. शिवकॉलनी, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. एका प्लॉटमध्ये त्यांचे नातेवाईक त्यांच्या घराच्या बाजूला राहतात. एका प्लॉटमध्ये राहत असल्याने त्यांना पाणीपट्टी भरण्यासाठी शेजारी राहणारे सईद खान यांच्यासोबत बुधवारी २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वाद झाला. त्यानंतर सईद खान, नजमा खान सईद खान, शबाना खान सईद खान, सलमान खान सईद खान सर्व रा. शिवकॉलनी यांनी सादीका युसूफ खान यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसचे लोखंडी कॉलमवर ढकलून दिले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून महिलेने तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता चौघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उषा सोनवणे करीत आहे.

Protected Content