यावल येथे मनसे व श्रीराम सेनेतर्फे श्रीराम मिरवणूकीत शरबत वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  प्रभू श्रीराम नवमीनिमित्ताने  यावल येथे सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील सहभागी सर्व श्रीराम भक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शरबत वाटप करण्यात आली.

 

 

यावेळी यावल शहरातील रेणुकामाता मंदीरा पासुन या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीस सुरूवात झाली, मिरवणुक शहरातील बेहडे सुपर शॉप या प्रमुख मार्गाने तरूणांच्या भजनी मंडळी व सवाद्य लेझीम पथकासह भव्य अशी श्रीरामनवमी च्या निमित्ताने  काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीची उत्साहाच्या वातावरणात शहरातील श्रीराम मंदीरात सांगता करण्यात आली.

 

या मिरवणुकीत सर्व तरूणांच्या झांज पथक व तरुणींचे लेझीम पथक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित यांच्या व श्रीराम सेनेच्या संयुक्त विद्यमाने शरबत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेने जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, ललीत परमार्थी, मनसेचे किशोर नन्नवरे व श्रीराम सेनेचे धनंजय सोनार, प्रसाद मिस्त्रि, हर्षल सोनवणे, प्रतिक येवले, प्रसाद बिरारी, पंकज कोळी, पवन तायडे, यश माळी, मुकेश तायडे, दिपक कुंभार, हितेश कुंभार, रोहीत कोळी, सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे व सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, वरिष्ठ सहाय्यक फौजदार अजीज शेख व पोलीसांचा बंदोबस्त चोख होता .

Protected Content