केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२०२३ चे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील के.सी.ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे नुकतेच अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२०२३ चे आयोजन करण्यात आले.

या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी तथा परीक्षक प्रा. शैलेश चेके(शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव), के.सी.ई.चे  प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, संशोधन आणि विकास विभागाचे डीन डॉ. दिलीप हुंडीवाले, अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, स्पॉक हॅकॅथॉन -२०२३ चे समन्वयक प्रा. राजेश वाघुळदे , प्रा. लीना वाघुळदे उपस्थित होते. प्रास्ताविक करतांना डॉ. प्रज्ञा विखार यांनी हॅकॅथॉन २०२३ च्या प्रक्रियेबद्दल विवेचन केले.

या कार्यक्रमात एकूण स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२०२३ च्या अंतर्गत सोळा थीम पैकी स्मार्ट एज्युकेशन, कृषी तंत्रज्ञान, स्मार्ट ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि ड्रोन, रिन्यूएबल एनर्जी, क्लीन अँड ग्रीन टेकनॉलॉजी, इत्यादी विषयांचा समावेश होता. विदयुत अभियांत्रिकी, कॉम्पुटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विदयार्थी -विद्यार्थिनींनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे त्यांनी त्यांच्या संशोधन, आयडिया, आणि समस्यांवर आधारित मते मांडली.

प्रमुख अतिथी तथा परीक्षक प्रा. शैलेश चेके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, संशोधन प्रकल्पाविषयी विविध फेरीसाठी पुढे जाण्यासाठी काही टिप्स सांगितले.

सूत्रसंचालन प्रा. लीना वाघुळदे यांनी केले तर आभार प्रा. राजेश वाघुळदे यांनी मानले.

अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२०२३ प्रसंगी प्रा. के.एम.महाजन, प्रा. पवार, प्रा. राहुल पटेल, प्रा. वैशाली सरोदे, प्रा. श्रुती बडगुजर यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाची धुरा प्रा. राजेश वाघुळदे यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.

Protected Content