अटल महापणन विकास अभियानातंर्गत जनजागृतीसाठी लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ

 

maxresdefault

 

जळगाव (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व त्यांच्या सभासद असलेल्या संस्थांच्या बळकटीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. अटल महापणन विकास अभियान अंतर्गत सुरु झालेल्या विविध उपक्रमांबाबत जनजागृतीसाठी लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव मेघराज राठोड यांच्या उपस्थितीत व जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.

 

याप्रसंगी जामनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देवराव देशमुख यांचेसह जिल्ह्यातील विविध कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. बी. गाढे, वाहेद तडवी, शशीकांत साळवे यांनी परीश्रम घेतले. या अभियानाचा उद्देश हा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ, सहकारी प्रक्रिया संस्था व विविध कार्यकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांना बळकट करणे, पणनच्या यात्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतकत्यांना कृषीपणन विषयक सुविधा देवुन संस्थांची आर्थिक उलाढाल वाढवणे.व याकामी समाजातील प्रत्येक घटक जसे, शासकीय संस्था, खाजगी संस्था (कार्पोरेट कंपन्या) व सभासद शेतकरी/जनता यांचा सहभाग घेणे असा आहे.

 

मुख्यमंत्री व मंत्री सहकार, पणन व वस्त्रोद्योग यांचे सुचनेनुसार राज्यामध्ये अटल महापणन विकास अभियानातंर्गत सहकारी पणन व्यवस्थेतील 5 हजार संस्थांचे सक्षमीकरण करणेबाबत उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. या उद्दीष्ठानुसार जळगाव जिल्ह्यास प्रत्येक तालुकानिहाय 15 याप्रमाणे एकुण 225 संस्था, यात विविध कार्यकारी संस्था व खरेदी विक्री संघ बळकट करण्यासाठी सदर संस्थांमार्फत नविन व्यवसाय सुरु करण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले होते. या उद्दीष्टाप्रमाणे दिनांक 25.12.2016 ते 31.03.2017 या कालावधीमध्ये 79 विविध कार्यकारी संस्थांनी 79 व्यवसाय सुरु केलेले आहेत. तर दिनांक 25.12.2017 ते 01.07.2018 या कालावधीमध्ये 14 विविध कार्यकारी संस्थांनी 14 व्यवसाय सुरु केलेले आहेत. तसेचदिनांक 25.12.2018पासून 9 विविध कार्यकारी संस्थांनी 9 व्यवसाय सुरु केलेले आहेत.

 

अटल महापणन विकास अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यात अभियान सुरु झाल्यापासुन 102 विविध कार्यकारी संस्थांनी 102 प्रकारचे व्यवसाय सुरु केलेले आहेत. यामध्ये शेतीला लागणारी औषधी विक्री, शेतीपुरक वस्तु विक्री, गोडावुन जागा भाड्याने देणे, पशुखाद्य विक्री, सेंद्रीय खत व पदार्थ विक्री, धान्य खरेदी विक्री, सेवा केंद्र, तोलकाटा, कृषी निविष्ठा विक्री अशाप्रकारचे शेतीपुरक व शेतक-यांना सेवा देणारे उदयोग सुरु केलेले आहेत. या उद्योगांमधून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अशी माहिती मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.

Protected Content